शिंदे सरकार ‘महाराष्ट्रा’साठी आहे का ‘गुजरात’साठी?

बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. तो प्रत्यक्षात साकार होत असताना अनेक अडचणी येत आहेत मात्र आता हळूहळू एक एक अडचण दूर होते आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मोदी सरकारला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. आता बुलेट ट्रेनचा 25 टक्के खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. राज्याकडून बुलेट ट्रेनसाठीचे सहा हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीच्या काळात बुलेट ट्रेनचा प्रकल्प रखडला होता मात्र आता त्याने वेग पकडला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारकडून सहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी जाणार म्हणजे चर्चा तर होणारचं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे ‘हे सरकार राज्यासाठी हानिकारक आहे’ असे म्हटले आहे.

आज राज्य सरकारने ६००० कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी म्हणजेच गुजरातच्या विकासासाठी मंजूर केलेले आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रासाठी काम करत आहे की गुजरातसाठी हा प्रश्न उभा राहतो.राज्यात अतिवृष्टीमुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी आम्ही केली आहे परंतु राज्य सरकारला आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प जास्त महत्वाचा वाटतो. या बुलेट ट्रेनसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही हे दुर्दैवी आहे’ असेही पटोले म्हणाले आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.