आता शिंदे गटाचे चिन्हदेखील वादाच्या भोवऱ्यात !

समता पार्टीने ठाकरे गटांच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेत दिल्ली हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढलेली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढालतलवार चिन्हावरदेखील आक्षेप घेण्यात आलेला आहे. शीख समाजाने शिंदे गटाच्या ढालतलवार चिन्हावर आक्षेप घेतलाय.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवे नाव आणि नवे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. घराघरात नवं चिन्ह कसं पोहोचवायचं याची रणनीतीदेखील आखली गेली पण आता ढाल तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप नोंदवण्यात आलाय.सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन देखील पाठवलंय. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्याने त्याचा निवडणून चिन्ह म्हणून वापर होऊ नये अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केलेली आहे. आता याववर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पहावं लागणार आहे.