शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट, वाचा…

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार या चर्चांना आता मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिलेला आहे. उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्याची परवनागी मिळालेली असून उद्धव ठाकरेंचीच तोफ शिवतीर्थावर धडाडणार असल्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र  यात एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच जाण्याचे संकेत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेत. कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करायचा असतो. पण हायकोर्टाच्या वर सुप्रिम कोर्टही असते. त्यामुळे सुप्रिम कोर्टात जायचं की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे केसरकर म्हणालेत. तसेच ही परवानगी शिवसेना म्हणून दिलेली नाही, तर त्यांनी पहिला अर्ज केला होता, सोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची हमी यावर परवानगी दिलेली आहे असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे. 

यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया आलेली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात पाहू आणि तिथे लढू असे परब म्हणालेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.