शिंदेंचं ठरलं, इतक्या बस, एवढ्या ट्रेन, प्लॅन काय ?

शिवसेना नेमकी कुणाची यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार तयार करताना दिसत आहेत. ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरु केलीय.शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून पाच लाख लोक येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी जवळपास पाच लाख लोक जमा करण्याची जबाबदारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे. राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येण्याची शक्यता आहे. विशेष ट्रेनदेखील बूक करण्यात आलेल्या आहेत. राज्यभरातील 40 आमदार आपले दोन ते तीन हजार कार्यकर्ते गोळा करणार आहेत याशिवाय जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी तारखेस देण्यात आली असून जळगावात तीन ट्रेन बुक करण्यात आलेल्या आहेत. यासाठी आगाऊ रक्कम म्हणून प्रत्येक ट्रेनसाठी २ लाख रुपये देण्यात आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची गर्दी नाही तर जनसंघाच्या सभेच्या गर्दीचा विक्रम मोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांची राहण्याची जेवण्याची चोख व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी मोठे हॉल, हॉटेल्स बूक करण्यात आलेले आहेत. शिंदे यांनी आपल्या खास लोकांवर यासाठी जबाबदारी दिलेली आहे. 

हे सगळं प्लॅन करण्यामागे शिंदेंचे दोन हेतू आहेत.शिवसेना आमची हा जो शिंदेंचा कोर्टातला युक्तिवाद आहे त्याला दसरा मेळावा घेतल्याने बळकटी येईल असे त्यांना वाटते आहे. तर त्यांचा दुसरा हेतू आहे शिंदे गटांमध्ये जायचं की नाही अशा काठावर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. त्यामुळे असे शक्तिप्रदर्शन केलं तर त्याचा फायदा होईल आणि गटामध्ये पुन्हा इन्कमिंग सुरू होईल अशी रणनिती असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोलले जाते आहे. आता शिंदेंचा दसरा मेळावा कसा असेल ते येत्या काही दिवसात समजेलच.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.