कोर्टाचा दणका, पण शिंदेंनी टाकला मोठा डाव, मोदी-शाह यांची एन्ट्री?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी जसा संघर्षमय काळ आहे त्याचप्रमाणे हाती आलेली सत्ता टीकविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे देखील जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेनेला प्रत्येक पावलावर चारीमुंड्या चीत करताना दसरा मेळाव्या संदर्भात मात्र शिंदेंना पराभवाची चव चाखावी लागलेली आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा अर्थात ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालेले आहे पण हा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडूनच टाकण्यात आलेला मोठा डाव आहे अशी चर्चा सुरु झालेली आहे.
शिवाजी पार्क मैदानावर ठाकेरंचा दसरा मेळावा होणार यावर आता कोर्टाकडूनच शिक्कामोर्तब करण्यात आलंय मात्र त्याचबरोबर बीकेसीवर शिंदेंचा दसरा मेळावा आहे. मातोश्री पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे बीकेसी मैदान आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. याला कारण आहे नुकतीच झालेली शिंदे यांची दिल्लीवारी. यात त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर आलेली आहे.
दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. शिंदे यांनी गुरुवारी अमित शाह यांची भेट घेतली होती त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.त्या भेटीत त्यांनी दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिल्याचे सांगितलं जातंय. हा शिंदे गटाचा पहिला मेळावा आहे तो दणक्यात करायचा असं शिंदे गटाकडून ठरविण्यात आलेलं आहे त्यासाठी युतीमधील मोठे नेते मंचावर आणण्याचा प्रयोग केला जावू शकतो. बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार असून त्याद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शना करण्याची तयारी शिंदेंकडून करण्यात येते आहे. कोर्टाने ठाकरेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकून मोदी-शाहंना आमंत्रण दिल्याची चर्चा सुरु आहे. आता खरंच मोदी-शाह दसरा मेळाव्याला येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण समजा तसे झाले तर ठाकरेंचा मेळावा शिंदेंच्या मेळाव्यासमोर फिक तर पडणार नाहीना अशी चर्चा आता सुरु झालेली आहे.