मातोश्रीला भेट कधी देणार? काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतल्यानंतर पहाटेच गोवा गाठले. त्यावेळी, इतर सर्वच बंडखोर आमदारांनी त्यांची जंगी स्वागत केलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आश्चर्याचे अनेक धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. त्यातच, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

मातोश्रीला भेट कधी देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात आपल्या सहकारी आमदारांसोबत सेलिब्रेशन केले, त्यांचे आभार मानले. त्यावेळी, बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत. कारण, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी, मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी मातोश्रीला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेल, असे वेळखाऊपणाचे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत. आता त्यांना सोबत घेऊनच शिंदे मुंबईला जाणार आहेत. विशेष म्हणजे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.