हा दाढीवाला तरुण नेमका कोण?

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेक नेटकऱ्यांनी सजवलेली एक रिक्षा आणि त्या बाजूला दाढी असलेली व्यक्ती असा फोटो शेअर करुन #EknathShinde असा हॅशटॅग ठेवलेला पहायला मिळाला. एख जिगरबाज मुख्यमंत्री अशा कॅप्शनही या फोटोला देण्यात आल्या होत्या. हा रिक्षावाला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा दावा करण्यात आला होता यासंदर्भात आम्ही सत्य तपासण्याचा प्रयत्न केला. 

हा फोटो तुम्ही नीट पाहिला तर त्यात सजवलेली रिक्षा आणि त्या रिक्षाच्या बाजूला दाढी असलेली एक व्यक्ती उभी आहे. त्या रिक्षाचा नंबर नीट पाहा MH 14 8172 हा फोटो १९९७ सालचा आहे. आता खरेपणा तपासण्यासाठी याच रिक्षाच्या नंबरने खूप मोठ मदत केली. रिक्षाचा नंबर पिंपरी-चिंचवडचा असल्यामुळे तिथे माहिती घेतली असता सत्य समोर आले. ते म्हणजे हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाही. हा फोटो आहे पिंपरी चिंचवड येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा आहे. काहीजणांना हा फोटो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे अशी चर्चा घडवायची होतीकाहीजणांना हा फोटो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे अशी चर्चा घडवायची होती त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले पण रिक्षावरील नंबरमुळे सत्य सगळ्यांसमोर आले. 

महाराष्ट्र रिक्षा पंचायत असे किवर्ड तुम्ही फेसबूकवर टाकून सर्च करा. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अकाऊंट तुम्हाला दिसेल. तिथे ऱिक्षा चालक ते अध्यक्ष बाबा कांबळे असा फोटो आणि माहिती तुम्हाला मिळेल. तिथूनच हा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल झाला असेल अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.