इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले….

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आज ( १७ ऑगस्ट) त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरबरोबर मस्क यांची डील रद्द झाल्यानंतर आता त्यांनी प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आपल्याला माहितच आहे मस्क यांनी ट्विटरसोबतच करार मोडल्यामुळे कायदेशीर कारवाईचा सामना करत आहेत. ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी करण्याची घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र दिवसांनी एलन मस्क यांनी हा करार रदद् केला आणि या प्रकरण कायदेशीर लढाई सुरु आहे.
आज मस्क यांनी ट्विट करत अशी माहिती दिली त्यात ‘मी मँचेस्टर युनायटेड विकत घेत आहे. तुमचे स्वागत आहे.’ दरम्यान या डीलबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लबपैकी एक आहे मँचेस्टर युनायटेड क्लब, हा क्लब सध्या अमेरिकन ग्लेझर कुटुंबाद्वारे नियंत्रित केला जातोय. हा संघ २० वेळा इंग्लंडचा चॅम्पियन बनला आहे. १६ ऑगस्ट रोजी या फुटबॉल संघाचे बाजारमूल्य २.०८ दशलक्ष डॉलर म्हणजेच १६,४७४ कोटी रुपये होते. २००५ मध्ये ग्लेझर कुटुंबाने ७९० दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ७,५८१ कोटी रुपयांना क्लब खरेदी केला होता. दरम्यान मस्क यांच्या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.