Elon Musk च्या वडिलांचा मोठा खुलासा, मुलीसोबत अफेअरनंतर आता म्हणाले…..

श्रीमंत व्यक्तींच्या जागतिक यादेत पहिल्या क्रमांकावर असणारे व स्पेस एक्स – टेस्ला सारख्या कंपन्यांचे मुख्य एलॉन मस्कचे (Elon Musk) यांचे वडील एरोल मस्क (Errol Musk) यांनी आपल्या आयुष्यातील धक्कादायक रहस्ये उघड केली आहेत. मागील आठवड्यापूर्वी त्यांचे आपल्या सावत्र मुलीशीच शारीरिक संबंध होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर याबद्दलची अजून माहिती त्यांनी दिलेली आहे. ही ही तशीच धक्कादायक आहे.

सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउटसोबत एरोल मस्क यांचं प्रेम प्रकरण होतं. जना ही ३५ वर्षांची तर एरोल हे ७६ वर्षांचे असून त्यांच्या या नात्याबद्दलची ही बातमी खूपच धक्कादायक होती. त्याचबरोबर एरोल आणि जना यांना दोन अपत्ये आहेत. ही माहिती एरोल मस्क यांनी दिली.

एरोल मस्कला सात अपत्ये


एरोल मस्क यांना एकूण सात अपत्ये आहेत. एलॉन मस्क आणि त्यांची चार भावंडे अशी एकूण पाच मुलं त्यांना आधी होतीच परंतु जना बेझुइडेनहाउट पासून त्यांना २०१७ मध्ये एक मुलगा झाला, त्याचं नाव इलियट रश असं आहे. तर २०१९ मध्ये एरोल आणि जना यांना अजून मुलं झालं. ती मुलगी आहे.

माये हॅल्डेमन मस्क या एलॉन मस्कच्या आई म्हणजेच प्रथम पत्नीपासून एरोल यांनी घटस्फोट घेतला. या जोडप्याला अॅलन, किंबल आणि टोस्का अशी तीन अपत्ये आहेत. यानंतर विधवा असणाऱ्या हेड बेझुइडेनहाउटबरोबर एरोल यांनी विवाह केला. हेड यांना आधीच दोन मुले होती. जना ही त्यापैकी एक. १८ वर्षांच्या संसारानंतर एरोल आणि हेड हे विभक्त झाले. मग जना बेझुइडेनहाउट आणि एरोल यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं. यातून त्यांना दोन अपत्ये झाल्याचं एरोल यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.