राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी बदलला WhatsApp DP; सूचक इशारा करणारा DP चर्चेत

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला जोरदार धक्का दिला. दोन्ही गट शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मग दोन्ही गटाकडून तीन चिन्ह आणि नावं देण्यात आली त्यात काल निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे तसेच ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले. एकूणच जून महिन्यापासून सुरु झालेल्या राज्यातील सत्ताकारणाला आता रंजक वळण मिळाले आहे हे खरे आहे.
आता ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल देण्यात आली आहे. या निर्णयाचं ठाकरे गटाने स्वागत केलं असून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात या मशाल चिन्हचा प्रचारही सुरु केलेला आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनीही आपला व्हॉट्सअप डीपीसुद्धा बदललेला आहे. या निर्णयानंतर शिवसेनेच्या ट्वीटरवरील डीपी बदलून मशालीचा डीपी ठेवण्यात आलेला आहे. त्याखाली ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नावसुद्धा दिसत आहे. अनेक शिवसैनिकांनी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर मशाल चिन्ह असणारे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलेला आहे.