फोनवर ‘वंदे मातरम्’ ‘हे काय नाटक?’ वारीस पठाण यांची टीका

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज राज्यात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यामुळे आता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोनवरील संवादाला सुरुवात करण्यापूर्वी हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावं लागणार आहे. या अभियानाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केलीच होती. शनिवारी या संदर्भातील जीआर काढण्यात आलेला आहे. सरकारच्या या निर्णयावर आता MIM च्या नेत्यांनी निशाणा साधला आहे.

भाजपजवळ काही मुद्देच शिल्लक राहिलेले नाहीत. कधी शहरांची नावं बदलायची तर कधी वंदे मातरम म्हणायला लावायचं. पण ही सगळी बेरोजगारी म्हणजे केवळ महागाईवरून लक्ष वळवण्याचे नाटकं आहे असे MIM नेते वारिस पठाण म्हणालेत. या निर्णयामुळे बेरोजगारी दुर होणार आहे का? महागाई कमी होणार आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

अभियानाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी झालीय.त्यांना नथुराम गोडसेने मारले. तो देशाचा पहिला दहशतवादी होता, त्याची तर हे सगळे पुजा करतात. गोडसे मुर्दाबाद हे तर त्यांच्या तोंडून कधी येणार नाही. फक्त अशा काही तरी मुद्द्यांवर लक्ष बाजूला करायचं आणि द्वेषाचे पसरवायचा हेच यांचे राजकारण आहे असा हल्लाबोल देखील पठाण यांनी केलेला आहे. समजा जर कोणी वंदे मातरम् म्हणाले नाही तर ते काय करायचे? गोळी मारणार का? असा सवाल देखील पठाण यांनी भाजपला विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.