मिस्त्रींच्या कारला अपघात झाला त्या रस्त्यावर…, तज्ज्ञांकडून मिळाली चिंताजनक माहिती

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं ४ सप्टेंबरला रस्ता अपघातात निधन झालं होतं. अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणी मर्सिडीची टीम राज्याच येवून अहवाल सादर करणार होती. ती टीम राज्यात आली आणि त्यांनी ज्या रस्त्यावर हा अपघात झाला त्याचा आढावा घेतला. ज्या रस्त्यावर मिस्त्री यांचा अपघात झाला तो रस्ता महाराष्ट्र आणि गुजरात यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. तज्ज्ञांच्या टीमने ७० किलोमीटर रस्त्याची पाहणी करून एक अहवाल सादर केलाय पण त्यातून चिंताजनक माहिती समोर आलेली आहे.
मर्सिडीची टीमकडून जो अहवाल सादर करण्यात आलाय त्यात रस्त्यावर पुरेशी व्यवस्था नाही त्यामुळे चालकाला नीट माहिती मिळू शकत नाही असे म्हटले आहे. दोन डझनपेक्षा अधिक ठिकाणी दुभाजक नाही, रस्त्याला मार्किंग्स नाहीत चालकांना माहिती देणारे बोर्ड अतिशय कमी आहेत असे अहवालाता म्हटले असून एकूणच रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठवड्याभरात रस्त्याचं ऑडिट करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (एनएचएआय) मंजुरी दिल्यानंतर रस्त्याचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आयआरएफनं दिलेली आहे. आयआरएफनं आपला अहवाल एनएचएआयला दिला आहे. दरम्यान राज्य सरकारकडून अपघाताचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास सुरू आहे.