अबब…..रिक्षा आहे की बस ?

एका रिक्षात कितीजण बसू शकतात तुम्ही म्हणाल, चार ते सहा पण फतेहपूरमधील एका रिक्षाचा व्हिडीओ समोर आलाय त्यात एक दोन तीन चार नव्हे तर तब्बल २७ जण बसले होते. वाचून तुम्हीसुद्धा चक्रावून गेला असाल पण हे खरं आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय.रिक्षामध्ये जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी चालकाला थांबवलं. त्यांनी सर्व प्रवाशांना रिक्षातून बाहेर येण्यास सांगितलं. रिक्षातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांची मोजणी पोलिसांनी सुरू केली. तेव्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोजताना पोलीसही हैराण झाले. कारण रिक्षात चालकासह तब्बल 27 जण बसले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरमधील बिंदकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असलेली एक रिक्षा पोलिसांनी रोखली. चालक अतिशय वेगात रिक्षा चालवत असताना ललौली चौकात पोलिसांनी रिक्षा अडवली. यानंतर पोलिसांनी रिक्षात बसलेल्या लहानमोठ्यांना उतरण्यास सांगितलं. पोलिसांनी प्रवाशांची मोजणी केली असता रिक्षात चालकासह 27 जण होते. यानंतर पोलिसांनी रिक्षा जप्त केली.पोलीस रिक्षातून प्रवाशांना उतरवून त्यांची मोजणी करत असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर त्याचा व्हिडीओ काढला.