सायरस मिस्त्री यांच्या अपघाताला ‘तो’ पूल जबाबदार?

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची चौकशी वेगवेगळ्या पद्धतीत करण्यात येतेय. ज्या चारोटी पुलाजवळ हा अपघात झाला त्या पुलाची रचना दोषपूर्ण असल्याचं मत फॉरेन्सिक टीमने म्हटले आहे.सायरस मिस्त्री पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अपघातीच कारणे शोधण्यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत आहेत

भरधाव असणाऱ्या मिस्त्रींच्या मर्सिडीज बेंज कारने केलेले चुकीचे ओव्हर टेक यामुळे ड्रायव्हर सीटवर बसलेल्या डॉक्टर अनाहिता पंडोले यांचा गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. तसेच मिस्त्रींचा मृत्यू सीट बेल्ट न लावल्यामुळे झाला असं कारण मेडिकल रिपोर्टमधून समोर आलंय. फॉरेन्सिक टीमच्या म्हणण्यानूसार अपघाताची कारणं त्यापैकी एक कारण म्हणजे पुलाची दोषपूर्ण रचना हे आहे. गाडीचा वेग आणि पुलाची दोषपूर्ण रचना यामुळे मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. पोलिसांबरोबर या अपघाताचा तपास करत आहेत सेव्ह लाईफ संस्था, या संस्थेचे सीईओ  पीयुष तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहीतीनुसार वेग, कमी दर्जाचे प्रशिक्षण आणि सेफ्टी साधनांकडे दुर्लक्ष करणे

या कारणांमुळे मृत्यू कसा होऊ शकतो याची जाणीव करून देणारा हा अपघात आहे असे सांगितले आहे. सेव्ह लाईफ संस्थेने या अपघातीची कारणे शोधण्यासाठी अपघाती गाडी, अपघात झालेले घटनास्थळ, साक्षीदारांच्या मुलाखती, मेडिकल रिपोर्ट याचा अभ्यास करून अपघाताची कारणे शोधली आहेत.फॉरेन्सिक टीम मध्ये असलेल्या एका सदस्याने ही पुलाची सदोष पूर्ण रचनाही मिस्त्री यांच्या कार अपघाताला कारण असल्याचं टाइप्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राला सांगितलंय. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनूसर सीट बेल्ट न घातल्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मोठं आहे. या संस्थेने अपघाताची १०० प्रकरणं हातळली असून त्यातील पस्तीस टक्के प्रकरणांमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.