5G स्मार्टफोन खरेदी करायची नको घाई !!

जर तुम्ही फोन आणि विशेषत: 5G फोन खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर कदाचित ही योग्य वेळ नाही. पण, जर तुम्ही महिनाभरानंतर 5G फोन घेतला तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. भारतात गेल्या २-३ वर्षांपासून 5G फोन विकले जात आहेत. पण, ते 5G Smartphones नावाने फक्त 5G आहेत . पण त्यात फक्त सिम मात्र 4G आहेत. इतकेच काय, काही लोकांकडे 5G फोन असूनही, ते खात्रीने सांगू शकत नाहीत की 5G सेवा भारतात आल्यावर त्यांचा फोन काम करेल ? पण, जर तुम्ही महिनाभरानंतर 5G फोन विकत घेतला तर तुमच्यासाठी खूप काही बदलेल आणि अनेक गोष्टी स्पष्ट होतील. जाणून घ्या अशीच ५ कारणे ज्यामुळे महिनाभरानंतर 5G फोन खरेदी केला तर अनेक फायदे होतील.
4G प्रमाणे 5G येणार नाही: सध्या, भारत सरकारकडून आलेल्या माहितीनुसार, देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. म्हणजेच ही सेवा अगदी छोट्या स्तरावर सुरू होणार आहे. त्यामुळे थोडं थांबा, २६ जुलैपासून सुरू होणारा 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण होताच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. 5G कोणत्या शहरात येणार आहे, कोणत्या बँडवर लाँच होणार आहे, 5G चे कोणते तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. भारतात, किंमत काय असेल आणि या वर्षी तुमच्या शहरात सेवा येईल की नाही? या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही 5G फोन घेण्यासाठी महिनाभर वाट पाहू शकता.
5G सिमच्या किंमती आणि अपग्रेडबद्दल बातम्या असतील : स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सिम कार्ड. ज्याशिवाय फोन अगदीच निकामी ठरतो. 5G सेवा आल्यानंतर, तुम्हाला तुमचे सिम देखील अपग्रेड करावे लागेल. कारण, हे 4G सिम 5G साठी काम करणार नाहीत. 5G सेवेच्या घोषणेसह, नवीन सिम आणि सिम अपग्रेडसाठी ऑफरची माहिती देखील उपलब्ध होईल. जी सध्या स्पष्ट नाही. म्हणूनच या क्षणी फोन घेण्यापेक्षा काही काळानंतर 5G फोन घेणे चांगले आहे. ज्याचे Main Feature तुम्ही किमान वापरू शकता.