‘इंस्टाग्राम’वर ‘फॉलोअर्स’ वाढवायचे आहेत, या टीप्स फॉलो करा !

येत्या काही वर्षात इंस्टाग्राम खूपच लोकप्रिय झालेलं आहे. वारंवार नेटकरी त्यावर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतात. इंस्टाग्रामकडे कमाईचे माध्यम म्हणूनही पाहिलं जात आहे पण त्यासाठी तुमचे फॉलोअर्स लाखांमध्ये असायला हवेत. जेव्हढे जास्त फॉलोअर्स तेव्हढी जास्त कमाई असं इंस्टाग्रामच्या बाबतीत म्हटलं जातं. इंस्टाग्रामवर आपले फॉलोअर्स जास्त वाढावेत म्हणून तुम्ही अथक प्रयत्न करत असाल त्यात आम्ही तुमची मदत नक्की करु शकतो. काही सोप्या टीप्स आहेत त्या वापरल्या की तुमचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स नक्कीच वाढतील
हटके कन्टेटला जबरस्त मागणी
जे वेगळं आहे नावीन्यपूर्ण आहे तेच इंस्टाग्रामवर जास्त बघितलं जातं. उदारहणार्थ खाद्यपदार्थ अनेकजण बनवून दाखवतात पण तुमचे वेगळेपण काय आहे ते दाखवून देणे महत्त्वाचे आहे.हटके कन्टेटला जास्त महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही जो कन्टेट शेअर करत आहात तो युनिक असायलाच हवा
नियमित फोटो, व्हिडिओ अपलोड करा
इंस्टाग्रामच्या बाबतीत नियमितपणा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली तर तुमचे फॉलोअर्स कसे वाढणार म्हणून नियमीतपणा महत्त्वाचा आहे.तुम्ही नियमीतपण युनीक आणि हटके कन्टेट दिला तर फॉलोअर्स नक्की वाढतील यात शंकाच नाही.तेव्हा इंस्टाग्रामवर काम करताना नियमीतपण फोटो, व्हिडीओ, रिल अपलोड करत जा.
हॅशटॅगचा करा वापर
तुमच्या इंस्टाग्राम पोस्टवर हॅशटॅगचा वापर आवर्जून करा. जे ट्रेडींग विषय आहेत त्यासंबंधात फोटो, व्हिडोओ केले तर हॅशटॅग वापरणे सोपं जातं.हॅशटॅगमुळे पोस्ट व्हायरल व्हायला होते आणि तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील.
कमीत कमी शब्दात कॅप्शन द्या
कॅप्शन म्हणजे व्हिडीओ किंवा फोटोवर तुम्ही जे नाव लिहीता ते अतिशय कमी शब्दात पण आकर्षक हवं. त्यात नाविन्यपणा तसेच जो विषय तुम्ही मांडलेला आहे तो अचून समजायल हवा.
कमेंट्सला उत्तर द्या
इंस्टाग्राम जेव्हा तुमचा फॉलोअर्स कमेंट करतो त्यावेळी त्याला उत्तर द्या. त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. फॉलोअर्सच्या कमेंटला उत्तर देण्याचे दोन फायदे आहेत. फॉलोअर्सचा आपलेपणा जपला जातो. एक नातं जपलं जातं आणि दुसरा फायदा म्हणजे कमेंटमुळे ऑडियन्स एन्गेज राहतो. एकाचा कमेंट त्याला उत्तर अशी चेन वाढत जास्त आणि त्याचा फायदा आपल्याला होतो.
तेव्हा इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असतील तर या टीप्स लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करायला विसरु नका