बच्चू कडू यांचा मुक्काम आता कारागृहात !

शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांना गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिलेते.आता १४ दिवस त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २०१८ मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Former Maharashtra minister and MLA Bachchu Kadu has been sent to judicial custody by Girgaon court in a case of obstructing a public servant during a political protest in 2018. He appeared before the court today after a non-bailable warrant was issued against him.
— ANI (@ANI) September 14, 2022
(file pic) pic.twitter.com/F5Dm4Qmz7g
२०१८ सालच्या एका राजकीय आंदोलनादरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप कडूंवर होता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकारी संघटनेने दिला होता.दरम्यान, आपण संबंधित अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, सरकारी अधिकारी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आमदार बच्चू कडू आज जेव्हा न्यायालयात हजर झाले, त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.