FoxConn चा प्रकल्प शिंदे-फडणवीसांमुळे गुजरातला? उदय सामंत म्हणाले…

१ लाख ५८ हजार कोटींचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारवर टीकेची झोड उठलेली आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावरुन घेतल्याचे आरोप शिंदे-फडणवीस सरकावर होत आहेत. शिंदे फडणवीस सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप होतोय. दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केलंय.
हा महाराष्ट्रातच येणार हे मागच्या दोन महिन्यात नक्की झालेलं नव्हतं. गुजरातसह इतर राज्यांना देखील त्यांनी प्रस्ताव दिला होता.विरोधकांनी उल्लेख केलेल्या बैठका मागच्या दोन महिन्यात झाल्या. चांगलं पॅकेज कसं देता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केली होती.जर बैठका वेळेवर झाल्या असत्या तर प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. चांगलं झालं तर आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते सरकारमुळे झालं असं जे काही पसरवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत ते योग्य नाही. मी यात राजकारण आणत नाही असे ही सामंत यांनी स्पष्ट केले.
जे राजकारण करतायेत त्यांनी फॉक्सकॉन वेदांताला जो वेळ मिळणं अपेक्षित होतं तो दिला गेला का? मागच्या वर्षभरात ते झालं नाही. वर्षभरात ज्या चर्चा होणं अपेक्षित होती ती झाली नव्हती.कोणताही उद्योजक हा वर्षभर थांबू शकत नाही. आत्ता जे राजकारण केलं जातं आहे ते योग्य नाही. राजकीय रंग या प्रकरणाला देण्याची आवश्यकता नाही असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय.