पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एक आवाहन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपण सगळे ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करत आहे की येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि सर्वांनी मिळून या मोहिमेला बळ द्यावे. 1947 साली आजच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला असे मोदी यांनी सांगितले. या प्रसंगी आपण सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत. असेही पंतप्रधान यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. यावेळी एक खास गोष्ट सांगावी लागेल ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचा फोटो देखील ट्विट केलेला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये १५ ऑगस्टची सुटी रद्द
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये १५ ऑगस्टची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच खासगी कार्यालयांना उत्तर प्रदेश मध्ये १५ ऑगस्ट रोजी सुटी नाही असे जाहीर करण्यात आलेले आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी उत्तरप्रदेशात मोठ्याप्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.तसेच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट रोजी जी प्रभात फेरी काढण्यातच येणार आहे त्यात ‘रघुपती राघव राजा राम’ आणि ‘वंदे मातरम’ म्हणावे अशा सुचना भाजपाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत.