तुम्ही आळशी आहात? ‘ही’ नोकरी तुमच्यासाठी !!

एक उत्तम नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण, चांगले व्यक्तीमत्व आणि आणि शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे एखाद्या नोकरीसाठी आळस आणि कंटाळा हे अवगुणांची मागणी असेल तर आळशी लोकांसाठी ही मेजवानीच ठरेल.
सध्या सोशल मीडियावर आळशी आणि कंटाळा असलेल्या लोकांसाठी नोकरीची जाहीरात व्हायरल होत आहे. या नोकरीसाठी तुमच्याकडे फक्त दोन वाईट सवयी असणे आवश्यक आहे. एक सवय आहे आळशी असणे आणि दुसरी सवय आहे दुःखी असणे. जर तुम्हाला या दोन्ही वाईट सवयी असतील तर तुम्ही या नोकरीसाठी योग्य उमेदवार आहात.
विशेष म्हणजे एका जाहिरातीद्वारे लोकांना या नोकरीबद्दल सांगितले जात आहे. ही जाहिरात एका दुकानाबाहेर लावण्यात आली होती. तेव्हा कोणीतरी या जाहिरातीचा फोटो काढून ट्विटरवर टाकला. आता ही जाहिरातीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे