आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेवर गौरी खान पहिल्यांदाच बोलली, म्हणाली…

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे सर्वात जास्त चर्चा झाली. गेल्या वर्षी देशभरात हे प्रकरण गाजलं त्यामुळे शाहरुखनला सुद्धा टीकेचा सामना करावा लागला होता.या प्रकरणात आर्यन खानला क्लिन चीट मिळाली मग आता पुन्हा हा विषय निघाला कारण गौरी खानने म्हणजे आर्यनच्या आईने या प्रकरणावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे. त्याचे कारण आहे करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण शो’!

२०२१ मध्ये घडलेल्या या प्रकरणाने खान कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. अनेक दिवस देशाच्या मुख्य घडामोडीत हे प्रकरण गाजत होतं. शाहरुख खान शुटिंग थांबवून भारतात परतला होता. यावर शाहरुख खान किंवा गौरी खाननं फारसं भाष्य केलं नव्हतं. करण जोहरच्या कार्यक्रमात मात्र गौरी खानने आर्यन खानच्या अटकेनंतरचा अनुभव सांगितलाय.

या शोमध्ये करण जोहरने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख केला नाही पण प्रश्न विचारताना असे म्हणाला की हे त्याच्यासाठी खूप कठिण होतं. तुम्ही सगळे या प्रसंगातून अधिक ताकदीने बाहेर निघालात.हे कुणासाठीही सोप्पं नाहीये. गौरी तू यामुळे अधिक ताकदीने उभी राहिली असे करणने विचारले. त्यावर गौरी म्हणाली,  आम्ही त्यातून गेलो त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मी म्हणेन की आपण एका चांगल्या ठिकाणी आहोत. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आपले मित्र, तसेच खूप सारे लोक ज्यांना आपण कधी पाहिलं नाही, ओळखत नाही. त्यांच्याकडून असंख्य मेसेज आले आणि त्यांचं खूप प्रेम मिळालं. यामुळे आम्हाला नशीबवान असल्याचं जाणवतंय. ज्यांनी मदत केली, त्या सर्वांची मी आभार मानते असे गौरी खान म्हणाली. कॉफी विथ करण ७ च्या नव्या भागात गौरी खानने हजेरी लावली होती त्यावेळी चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूरही या कार्यक्रमात उपस्थित होत्या. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.