अदानी देणार सर्वांना धक्का, जगातील टॉप-३ सोबत भिडणार

भारताचे प्रसिद्ध उद्योपती गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ होताना दिसते आहे. आशियामधील अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांचा दबदबा कायम आहे.
मायक्रोसॉफ्टचे सहसंपादर बिल गेट्स यांनी २० अब्ज डॉलर्सची संपत्ती दान केल्यामुळे गौतम अदानी अब्जाधिशांच्या यादीत पुढे सरकले आहेत. अदानी यांची संपत्ती ज्या वेगाने वाढते आहे त्यामुळे लवकरच अदानी अब्जाधीशांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर येतील असे स्पष्ट दिसते आहे.
फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकांनुसार हाती आलेल्या माहितीत गौतम अदानी यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. जर हाच वेग कायम राहीला तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकत अदानी पुढे निघून जातील. या दोन्ही अब्जाधीशांमधील संपत्तीचे अंतर कमी होताना दिसते आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १.२ बिलियनने वाढून १३१.१ बिलियन इतकी झाली असून ते जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत.