माजी मुख्यमंत्र्यांची सुन असलेल्या जेनिलियाची आहे इतकी संपत्ती !

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिलिया डिसुजा-देशमुखचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. लग्नानंतर जेनिलियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झालेला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच ऍक्टीव आहे. जाने तू या जाने ना या चित्रपटातून जेनिलीयाला ओळख मिळाली. हिंदीसोबत तिने दाक्षिणात्य सिनेमा केलेले आहेत. तिचे करिअर घडविण्यामागे तिच्या आईचा मोठा वाटा असून तिचे नाव म्हणजे आई-बााबंच्या नावाचा एक भाग आहे. जेनिलियाच्या आईचे नाव जेनेट तर वडिलांचे नाव नील आहे. यावरुनच तिचे नाव जेनिलिया असे ठेवण्यात आले. तिच्या नावाचा दुर्मिळ किंवा अद्वितीय असा होतो.
तुझे मेरी कसम या चित्रपटातून जेनिलियाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाचा नायक रितेश देशमुख होता. या चित्रपटाच्या दरम्यान दोघे प्रेमात पडले आणि ९ वर्षे एकमेकांना डेट करुन दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून एक क्युट कपल म्हणून त्यांची खास ओळख आहे.सध्य जेनिलिया सिनेमात आपल्याला दिसत नसली तरी जाहिरात आणि ब्रँण्ड प्रमोशनच्या माध्यमातून ती चांगलीच कमाई करते आहे. एका रिपोर्टद्वारे हाती आलेल्या माहितीनुसार जेनिलियाची संपत्ती ४२ कोटी रुपये असून ती चित्रपटासाठी जेनिलिया एक ते दोन कोटी रुपये मानधन घेते. फँटा,एल.जी मोबाइल, पर्क, मार्गो या ब्रँडसाठी जाहिराती करुन जेनिलियाने चांगलाच पैसा कमावलेला आहे. एकूणच जेनिलियाचे नेटवर्थ खूपच चांगले आहे.