‘शिवसेने’नंतर ‘काँग्रेस’मध्येही बंडाळी?, कोणत्या बड्या नेत्याने दिला राजीनामा?

शिवसेनेत झालेली बंडखोरी आपल्याला माहित आहे. आता ही बंडखोरी देशाती एका मोठ्या पक्षात  सुद्धा दिसून येते आहे. तो पक्ष आहे काँग्रेस. आता काँग्रेसमध्येही बंडाचे संकेत मिळू लागले आहेत. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आझाद यांची नियुक्ती  जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होता मात्र त्यांनी नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा दिला. आझाद यांनी राजीनामा देताना प्रकृतीचे कारण दिलेले आहे पण काही काळापासून ते पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आझाद पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत असेही म्हटले जाते आहे. 

जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढाव्यात अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती पण आझाद यांनी ही जबाबदारी नाकारली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलेला आहे. 

काँग्रेसमध्ये एक निष्ठावंत नेता म्हणून गुलाम नबी आझाद यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसात काँग्रेसमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेस पक्षाच संघटनात्मक बदल व्हावेत म्हणून सोनिया गांधी यांनी २३ नेत्यांनी पत्र लिहीलं होतं त्यातील एक नेता म्हणजे आझाद आहेत. त्यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारल्यामुळे ते नाराज आहेत असेही बोलले जाते आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.