‘उद्या सेनाभवनसाठी मारामाऱ्या होणार’, भाजप नेत्याचे भरसभेत वक्तव्य

50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही अशी टीका करत मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता ते नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत. परवा मैदानासाठी भांडत होते, पुढे काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील असं म्हणालेत.
अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीशी शिवसेनेनंच खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत, परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
भाजप आणि शिंदे गटाने युती करुन राज्यात सत्ता स्थापन केलेली आहे पण यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात लढाई सुरु झालेली आहे. सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाची या ना त्या कारणावरुन लढाई होतच असते. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. हीच गोष्ट भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे. जामनेर येथे आयोजित केलेल्या पाचोरा जामनेर रेल्वे च्या कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते.