रेशनकार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! ऑक्टोबर महिन्यात मोदी सरकार देणार विशेष सुविधा

तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तसेच तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत मोफत रेशन घेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोफत रेशन वितरणाची योजना सहा महिन्यांनी म्हणजेच मार्च 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याब करण्यात आलेली नाही. मोफत रेशन वितरण सेवा मोदी सरकारने एप्रिल 2020 म्हणजे कोरोनाच्या काळात सुरु केली होती. अधिकाऱ्यांच्या मते प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे. यासाठी सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. यासाठी सरकारकडून स्टॉकच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे. सरकारने आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये या योजनेवर खर्च केलेत. सरकारने योजेच्या कालावधीत वाढ केल्यामुळे लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.