Google ची ChatGPT ला टक्कर ! AI लिहिणार तुमचा मेसेज

अलिकडेच ChatGPT आणि बिंग यांना एकत्र आणत मायक्रोसॉफ्टनं तंत्रज्ञान जगतात मोठा बदल केला. आता गुगलही चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारीनिशी बाजारात उतरले असून गुगलने वर्कस्पेस ॲप्ससाठी AI फीचर्स जाहीर केलंय. त्यामुळे युजर्संना जीमेल, डॉक्स आणि इतर ॲप्सवर AI फिचर्स वापरता येतील.

तुम्हाला जर आता Gmail वर काही लिहायचं असेल तर, गुगलचं नवं AI Power Tool तुमचं हे काम चुटकी सरशी करणार आहे. तुम्ही गुगल ॲप्समध्ये एखादा विषय टाईप केला तर गुगलचं नवीन फीचर AI Power Tool टूल तुम्हाला मजकूर लिहून देईल. तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. AI Power Tool तुम्ही टाईप केलेल्या विषयासंबंधित मजकूर उपलब्ध करुन देईल, त्यामुळे तुम्हाला गुगल ॲप्समध्ये स्वत: लिहायची गरज पडणार नाही, गुगलचं नवीन AI टूल तुमच्यासाठी हे काम करेल.

गुगलने चॅटजीपीटी चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी Bard चॅटबॉट लाँच केलाय.आता गुगलने ॲप्ससोबत AI फीचर जोडलं आहे. यामुळे युजर्सना Google Docs, Gmail, Sheets आणि Slides सारख्या ॲप्समध्ये AI पॉवर्ड फीचर्स मिळतील. गुगलने ब्लॉग लिहून याबाबतची माहिती दिलीय.

AI फीचर्स सध्या सर्व युजर्ससाठी नसून केवळ निवडक युजर्ससाठी लाँच करण्यात येईल. कंपनी येत्या काही दिवसांत निवडक युजर्संना टेस्टिंगसाठी हे फीचर सुरु करेल. त्यानंतर कंपनी या फीचर्समध्ये योग्य सुधारणा करुन सर्व युजर्ससाठी हे फीचर्स लाँच करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.