iPhone च्या स्पर्धेत आता गूगल उतरणार? लवकरच गूगल आणणार हा स्मार्टफोन

अ‍ॅपलचा आयफोन शूटिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. आयफोन 14 वरून अनेक चित्रपट शूट केले गेले आहेत. आता गुगल स्वतःचा जबरदस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे. Pixel 8 स्मार्टफोनसाठी नवीन ‘व्हिडिओ अनब्लर’ टूलवर काम करत आहे. व्हिडिओ अनब्लर टूल यूजर्सचे व्हिडिओ क्रिस्प आणि क्लियर करेल. 

मशीन लर्निंगच्या मदतीने, या टूलने पूर्वी कॅप्चर केलेल्या व्हिडिओंना अधिक स्पष्ट स्वरूप देणे अपेक्षित आहे. Google Photos मधील फोटो अनब्लर टूल, जे फोटो ब्राइट करण्यासाठी Tensor चिपच्या मशीन लर्निंग क्षमतेचा लाभ घेते, जे Pixel 7 सीरीज लाँच करताना सादर करण्यात आले. Pixel 8 आणि Pixel 8 Pro 12 GB RAM पॅक असण्याची अपेक्षा आहे.शिवाय, प्रो मॉडेल 2822/1344 पिक्सेलचे डिस्प्ले रिझोल्यूशन ऑफर करण्याची शक्यता आहे, तर Pixel 8 स्टँडर्ड 2268/1080 रिझोल्यूशन ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.