गुगलचा चीनला तगडा झटका, बंद करण्यात आली ही खास सर्व्हिस !

गुगलने कोरोना काळापासूनच चीनमधील आपली सेवा कमी केलेली आहे पण आता गुगुलकडून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. गुगलने चीनमधील आपली गुगल ट्रान्सलेट सर्व्हिस बंद केलेली आहे. यापूर्वी गुगलने आपल्या प्रोडक्ट्सचे मॅन्यूफॅक्चरिंग चीनमधून दुसऱ्या देशात हलवले होते. याचा एक भाग म्हणून गूगलने आपल्या पिक्‍सल फोनच्या निर्मितीसाठी चीन ऐवजी भारताला प्राधान्य दिलेले आहे.

चीनमध्ये ‘गुगल ट्रान्सलेट’ अॅपवर आणि वेबसाइटवर युजर्सना एक सर्वसाधारण ‘सर्च बार’ आणि ‘लिंक’ दिसत असते, तिथे क्लिक केल्यावर ती हाँगकाँगमध्ये उपलब्ध कंपनीच्या वेबपेजवर घेऊन जाते. या वेबपेजवर चीनमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. चीनच्या अनेक युजर्सनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शनिवारपासूनच ‘गूगल ट्रान्सलेट’ सेवा बंद केली आहे अशी माहिती दिलीय. गूगल क्रोम ब्राउझरमधील ट्रान्सलेशन फीचरही आता चीनमध्ये काम करत नाही असे त्यांनी सांगतिले आहे. दरम्यान चीनमध्ये गुगल ट्रान्सलेटचा कमी वापर होत असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे असे निवेदन गुगलकडून जाहीर करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.