राज्यपाल महोदयांचे स्पष्टीकरण, म्हणाले….

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून टीकेची झोड उठलेली असताना राज्यापालांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपाल म्हणाले,’मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केलेले आहे. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देवून या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिकच आहे. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झालेली आहे ती आपल्याला बदलावीच लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.’ असेही राज्यपालांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.