मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार?, CM शिंदेंच्या मंत्र्याने केला गौप्यस्फोट

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे दोघांचा जोरदार संघर्ष राज्यात पहायला मिळतोय. दोन्ही गट इनकमिंग वाढवत असून आपणच खरी शिवसेना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि स्वीय सचीव मिलींद नार्वेकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असा गौप्यस्फोट शिंदे गटातील एका नेत्याने भर सभेत केलेले आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेना फक्त शिल्लक सेना राहील असा सुतोवाच शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांनी केला होता. आता तुम्ही विचार करत असाल कोणत्या मंत्र्याने हा गौप्यस्फोट केलाय. तर ते आहेत राज्यातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांनी धुळे येथे हे वक्तव्य केलेले आहे. मंत्री गुलाबराव पाटील सध्या धुळे दौऱ्यावर आहेत.
गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदे हे नार्वेकरांच्या घरी गेले होते. अशी चर्चा आहे की १५ दिवसात दोनदा मुख्यंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची भेट झालेली आहे. दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात नार्वेकर दिसले नाहीत. ठाकरेंच्या आसपास सध्या रवी म्हात्रेच दिसून येतात त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला वजीर बदलाल की नार्वेकर गट बदलण्याच्या विचार आहेत अशी चर्चा होते आहे. त्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात केली उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती दिलीय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.