सोशल मीडियावरील DP वर तिरंगा का नाही? RSS ने दिले उत्तर, म्हटले…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा करण्यात येतो आहे त्यासाठी अनेक उपक्रम राबिवण्यात येत आहेत. सोशल मीडियवर आपण पाहत असाल तर अनेकांनी आपल्या प्रोफाईलवर राष्ट्रध्वजाचे फोटो लावलेले आहेत. अगदी पंतप्रधानांपासून अनेक राजकीय नेत्यांनी प्रोफाईलवर तिरंगा लावलेला आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ने मात्र आपला प्रोफाईल फोटो बदलेला नाही. यामुळे RSS  ट्रोल झाले असून आता त्यावर RSS ची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे की या गोष्टींचे राजकीयकरण टाळले पाहिजे. खरंतर अशा गोष्टींचे राजकारण केले जावू नये.RSS आधीच ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांना पाठिंबा दिलेला आहे. संघाकडून लोकांना तसेच स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पाठिंबा द्या तसेच सहभाग नोंदवा असे आवाहन केलेले आहे.सरकार, खाजगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असे आवाहन केले असल्याची माहिती आंबेकरांनी दिलेली आहे. पीटीआय सोबत बोलत असताना सुनील आंबेकर यांनी हे उत्तर दिलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही RSS ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर तिरंग्याचे चित्र न लावल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले होते.या संदर्भात आंबेकरांनी भूमिक स्पष्ट केली असून असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवायला हवेत असेही नमुद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.