हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने आज सकाळी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापेमार केली. काल सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी १३ तासांनी संपली आहे. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील कागल आणि पुण्यातील विविध घरांवर ही करावाई करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या या छापेमारीबाबत मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
चौकशी शांततेत पार पडली
“आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आहेत. आमच्या घरासमोर जे लोक उभे होते, त्यांचे मी आभार मानतो. चौकशी शांततेत पार पडलेली आहे. ही धाड राजकीय हेतूने झालेली आहे,” असे नावीद यांनी सांगितले.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
याबाबत हसन मुश्रीफ यांनीहि प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. तसेच “माझ्यावरील ईडीच्या या कारवाईविरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले होते.