सफरचंद आरोग्यवर्धक पण सफरचंदाच्या पोटात दडलंय विष !!

सफरचंद म्हणजे आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ असे म्हटले जाते. आजारी व्यक्तीला भेटायला जाताना आवर्जून सफरचंद घेवून जातात. अगदी डॉक्टरपण सल्ला देतात सफरचंद खा आणि निरोगी राहा. सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होत असला तरी, सफरचंदाच्या पोटात दडलेल्या बिया प्रचंड हानी पोहोचवू शकतात. बहुतेक लोक बिया काढून टाकल्यानंतरच सफरचंद खातात, पण कधी कधी चुकून एक-दोन बिया तोंडात गेल्या तर त्याही खाल्ल्या जातात. सफरचंदाच्या बियांवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

सफरचंदाच्या बिया मानवासाठी हानिकारक असतात यात शंका नाही. पण, जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात सेवन करते तेव्हा त्या शरीराचे नुकसान करतात. सफरचंदाच्या बियांमध्ये ‘अमिग्डालिन’ नावाचे संयुग असते जे विषारी असते. हे संयुग बियांच्या आत असते. बियांचे संरक्षण करण्यासाठी, त्यावर एक थर लावला जातो जो खूप कठीण असतो. जेव्हा बिया गिळल्या जातात तेव्हा पोटातील रसायने त्याचा थर तोडण्यास सक्षम नसतात. त्यामुळे विषारी संयुग बाहेर पडत नाही, परंतु, बिया चघळल्या किंवा खाल्ल्या गेल्यास ‘अमिग्डालिन’चे हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतर होते. हे खूप हानिकारक आहे आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

2015 च्या संशोधनानुसार, सुमारे 50-300 मिलिग्रॅम हायड्रोजन सायनाइडची मात्रा घातक ठरू शकते. सफरचंदाच्या एका बियामध्ये 0.6 मिलिग्रॅम हायड्रोजन सायनाइड असते. म्हणजे 80 ते 500 बिया खाल्ल्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. आता यावर उपाय काय तर अमिग्डालिन टाळण्यासाठी, सफरचंद खाण्यापूर्वी आणि सफरचंदाचा रस पिण्यापूर्वी त्यांच्या बिया काढून टाकणे. 

संशोधनादरम्यान असेही आढळले सफरचंदाच्या ज्यूसमध्ये ‘अमिग्डालिन’चे प्रमाण 0.001 ते 0.007 प्रति मिलिलिटर प्रति मिलिलिटर आहे जे खूप कमी आहे. शास्त्रज्ञांनी असेही स्पष्ट केले आहे की कॅन केलेला ज्यूसमध्ये असलेल्या अॅमिग्डालिनमुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, सफरचंद खाण्यापूर्वी किंवा घरी त्याचा रस काढण्यापूर्वी बिया काढून टाकल्या पाहिजेत, असा आग्रहही येथील शास्त्रज्ञांनी दिला. सफरचंद आणि त्याची साल आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि त्यांना कोणताही धोका नाही. एका सफरचंदात आठ किंवा 10 बिया देखील असतात, ज्यामुळे आरोग्याला फारशी हानी होत नाही, परंतु फक्त हे लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीने सफरचंदाच्या 80 पेक्षा जास्त बिया खाऊ नयेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.