अननस फळ एक, फायदे अनेक !!

अननस हे फळ खायला उत्तम शिवाय वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे. अननस फळ म्हणून किंवा ज्युस म्हणून आपण खात असतो. अननसाचा वापर केक, आईसक्रिममध्ये केला जातो. अननसाचा शिरा बनतो एकूणच चविष्ठ फळ म्हणून अननासाकडे पाहिलं जातं.  

अननसमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. अननसाचे सेवन चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी अननसाचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होते.

अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येते.अननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते.यामध्ये मॅगनीज आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

अननस खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित करता येते. लवकर भूक लागत नाही. अननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.