राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आता हॉलिवूडमधून पाठिंबा!! ‘या’ अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी राहुल गांधी यांंनी परिधान केलेला टी-शर्ट असो किंवा राहुल गांधी यांच्या विवाहाची चर्चा ! आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेची चर्चा आहे कारण हॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक जॉन क्यूसैक यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिलेला आहे. ‘सेरेन्डिपिटी’, ‘हाई फिडेलिटी’, ‘कॉन एयर’ और ‘२०१२’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला जॉन क्यूसैक सोशल मीडियावर ट्विट केलंय.
जॉन क्यूसैक यांनी भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत असे ट्विट केले होते. त्यांना एका युजरने धन्यवाद असा रिप्लाय दिला त्यावर अभिनेता जॉन क्यूसैक यांनी होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध असे ट्विटे केले आहे. या आधी जॉन यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
Yes – solidarity – to all anti fascists everywhere ! https://t.co/IvKE2jzPW7
— John Cusack (@johncusack) September 23, 2022
२०२४ लोकसभा निवडणुकिची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठीच काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झालेला आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी जनतेला भेट देत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे.