ठाकरे, शिंदेंना या मुद्द्यावरुन कोंडीत पकडणार?

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण यावरही दावा सांगितलेला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना अवघ्या काही तासांची वेळ दिली आहे. खरी शिवसेना तुमचीच कशी याची कागदपत्रं शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करा असं निवडणूक आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का? याची जोरदार चर्चा आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दाव सांगितला असून त्याबाबतचे दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सोपवले आहेत. यासाठीच शिवसेना नेते अनिल देसाई आजा दिल्लीत होते. आम्ही आमची कागदपत्रं सादर करण्यासाठी आणखी अवधी मागितलाय अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी दिलेली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रं सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे.
शिंदे गटाने असे सांगितले आहे की एकनाथ शिंदे यांनाच आम्ही मुख्यनेता म्हणून निवडलेले आहे. त्याुळे चिन्ह आम्हालाच मिळायला हवे. तसेच अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होऊ शकतो त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा असंही निवडणूक आयोगाला म्हटलंय. तर ठाकरे गटाकडून असा युक्तीवाद केला जावू शकतो की शिवसेनेत बंड केलं तेव्हाच शिंदेंना नेतेपदावरून काढून टाकलं आहे
अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जी परिस्थिती असते ती जैसे थेच राहण्याची शक्यता असते. त्यामुळे यावरून ठाकरे गटाकडून युक्तीवाद केला जावू शकतो. कारण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तो कार्यक्रम रद्द करता येत नाही हा मुद्दा पुढे येऊ शकतो.