सुंदर त्वचेसाठी असा हवा ‘साबण’ !


त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी ‘साबणा’चा वापर अनादिकाळापासून होतो आहे. साबणामुळे शरीर स्वच्छ होतं. मात्र बाजारात मिळणारे सगळेच साबण आपल्या त्वचेसाठी बनलेले नसतात. आपल्या त्वचेच्या प्रकारानूसार साबणाची निवड करायला हवी. आता त्वचेच्या प्रकारानुसार कोणते साबण लावावेत याची माहिती या लेखात दिलेली आह

कोरडी त्वचा
जर आपली त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर साबण जरा जपूनच निवडावा लागेल. कारण चुकीचा साबण आपल्या त्वचेचं नुकसान करू शकतो. ज्या साबणात सोडियम लॉरील सल्फेट आहे त्याचा वापर टाळावा. यातील सर्फेक्टंटमुळे त्वचेचा कोरडेपणा जास्त वाढतो. म्हणून कोरडी त्वचा असणाऱ्यांनी नैसर्गिक साबणाचा वापर करावा. आता नैसर्गिक साबण म्हणजे असे साबण ज्यात वनस्पतींच्या तेलाचा वापर केलाय. ज्या साबणात भाज्याचे तेल, कोको बटर, ऑलिव्ह ऑईल, कोरफड, जोजोबा आणि अ‍ॅवोकाडो यांचा अर्क वापरला असेल तर ते साबण कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम आहेत. समजा जर तुम्हाला असे नैसर्गिक तेल किंवा अर्कापासून तयार झालेले साबण सापडले नाहीत तर ग्लिसरीन असलेल्या साबणाचा वापर करा त्यामुळे त्वचेतील ओलावा टीकून राहतो. मॉर्डन डर्मिटोलॉजीचे पार्टनर आणि डर्मिटोलॉजीस्ट रोंडा क्लेन एमडी यांच्यानूसार ज्या साबणांमध्ये सल्फेट,अल्कोहोल आणि कृत्रिम सुगंधाचा वापर केला जातो ते साबण कोरडी त्वचा असणाऱ्यांनी टाळावेत.

सामान्य त्वचा
तेलकट आणि कोरडी नसलेली त्वचा म्हणजे सामान्य त्वचा होय. तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठी वापण्यात येणारा साबण सामान्य त्वचेसाठी उपयोगाचा नाही. सामान्य त्वचेची खास काळजी घ्यावी लागते कारण त्वचेवरील छिद्र अदृश्य असतात त्वचा मऊ असते. हवामानातील बदल सामान्य त्वचेवर जास्त परीणाम करतो म्हणून मॉईस्चराईजर असणारा साबण वापरणे योग्य आहे.त्यामुळे त्वचा अधिक मुलायम राहण्यास मदत मिळते. सामान्य त्वचा असणाऱ्या व्यक्तींंनी सतत साबण बदलू नयेत. केमिकलयुक्त, दाणेदार किंवा उच्च पीएच असणारे साबण सामान्य त्वचेसाठी वापरू नये.

तेलकट त्वचा
आपल्या त्वचेवर सिबम नावाचा थर असतो. यामुळे त्वचेला चकाकी मिळते पण काहीजणांमध्ये या सिबमचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. यामुळे त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेवर धुळीचे कण चिकटून बसतात. या जास्तीच्या सिबममुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात. म्हणून वेळीच सावध होवून तेलकट त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. काहीवेळा आनुवंशिकरित्या किंवा हार्मोन्समुळेही त्वचा तेलकट असते. तेलकट त्वचेसाठी सौंम्य क्लिंजरसह लिंबू किंवा ग्लिसरीन असलेला साबण वापरू शकता.यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि तेलकटपणा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

संवेदनशील त्वचा
एक साधा आणि नैसर्गिक साबण संवेदनशील त्वचेसाठी योग्य आहे. कडुलिंब, बकरीचे दूध, मध , गाजर आणि दुधाचे गुणधर्म असणारे साबण संवेदनशील त्वचेसाठी वापरावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.