‘हे’ उपाय कराल कर केसातील कोंडा होणार झटक्यात गायब

केसात कोंडा होणे ही आता सर्वसामान्य समस्या झालेली आहे. अगदी लहानमुलांच्या केसातसुद्धा कोंडा होतो. आपण अनेक महागडे उपाय करतो त्याचा काही काळापुरता फायदा होतो पण पुढे कोंडा होतो तो होतोच. या महागड्या उपायामुळे खिशाला त्रास होतो तसेच अनेकदा साईड इफेक्टचा सामना करावा लागतो. कोंडा होण्याची अनेक कारणे आहेत विशेष करुन आपलं बदललें राहणीमान हे खास कारण आहे.
थंडीत होतो जास्त कोंडा
तसं पाहिलं तर थंडी सर्वात जास्त कोंडा होतो. कारण थंडीत कोरडेपणा वाढतो त्यामुळे आपल्या त्वचेवर जसा परीणाम होतो तसाच केसात देखील कोरडेपणा वाढतो. केसांना योग्य पोषण मिळालं नाही तर कोंड्याचा त्रास होतो. जास्त तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ खाल्ले तर कोंड्याचा त्रास होतो. थंडीत पाणी प्यायलं जातं म्हणूनही थंडीत कोंडा वाढतो. त्यात केमिकलयुक्त कॉस्मेटीक प्रोडक्टसचा मारा केलात तर केंसाचा जीव जातो असंच म्हणायला हवं. तुम्ही थोडे घरगुती उपाय करुन पाहा. त्यात थोडा वेळ नक्की जातो पण फायदा असतो शिवाय त्याचा फारसा दुष्परीणाम होत नाही.
कोंडा दूर करण्याचे घरगुती उपाय
- लिंबू कोंड्यावर सर्वोत्तम आहे. ३ ते ४ लिंबांची साले काढून अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी ही लिंब उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर हे पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसांमध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.
- हेअरवॉश घेण्याआधी चार ते पाच चमचे तेल घ्या. ते एका पळीत गरम करा त्यात छोटा चमचा मेथी दाणे, चार ते पाच कडिपत्त्याची पाने आणि एक जास्वंदीचे फुल घाला. हे सगळं छान उकळू द्या. दहा मिनीटांनी गॅस बंद करा आणि तेल कोमट असताना ते गाळून घ्या. हे तेल गार झालं की आपलं चंपी तेल तयार आहे. या तेलाने केसांना मालिश करा. तासाभराने सौम्य शॅम्पुने हेअरवॉश घ्या. आता जो गाळ उरला आहे त्याला कुस्करून त्यात आवळा पावडर घालून हेअरपॅक म्हणून वापरु शकता. पण हा हेअरपॅक तीन-चार दिवसांनी लावा कारण आपण ताजं चंपी तेल तयार केलंय ते तुम्ही वापरलेलं आहे.
- ही सगळी कटकट करायची नसेल तर कडुलिंबाची पाने बारीक वाटून छान पेस्ट तयार करा आणि केसांना लावा कोंडा कमी होतो..
- तुळशीची पाने आणि आवळ्याची पावडर पाण्यामध्ये एकत्र करा. हा हेअरपॅक केसांना लावा. हळूहळू केसांना मालिश करा.अर्ध्या तासानंतर हेअरवॉश घ्या. कोंडा तर कमी होतोच शिवाय आवळ्यामुळे केसांचे पोषण होते.
हे उपाय करुन पाहा आणि कोंड्याला दूर पळवून लावा. आपले केसं आपलं सौंर्दय आहे. त्यावर केमिकलचा मारा नको त्याला सांभाळा.