पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? मग करा ‘हे’ उपाय

पावसाळ्यात मच्छर, माशा, किड्यांचे प्रमाण अधिक वाढते. पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवणे एक आव्हान ठरते. मात्र उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी घरात डास, माशांचा घरात शिरकाव न होऊ देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात माशा खुप त्रास देतात. जर तुमच्या घरात माशांचा त्रास वाढला असेल तर हे काही घरगुती उपाय ट्राय करा.
कापूर स्प्रे
कापराच्या वासामुळे माश्या पळून जातात. 8 ते 10 कापरांपासून पावडर तयार करा. पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटल मध्ये भरा. आणि घरात स्प्रे करा.
मिरचे स्प्रे
जास्त प्रमाणात माशा घरात येत असतील तर, मिरची स्प्रेचा वापर उत्तम आहे. मिरची स्प्रे बनवण्यासाठी 2 ते 3 मिरचींची पावडर तयार करा. ही पावडर उन्हामध्ये ठेवून 2 दिवसानंतर मिरची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि वापरा
एसेन्शियल ऑइल स्प्रे
लवंग तेल, पेपरमिंट ऑइल, ओव्याचं तेल या सारखे एसेन्शियल ऑइल माशांना पळवून लावण्यासाठी उत्तम आहे. 2 कप पाणी 2 कप व्हिनेगर आणि 10 थेंब कोणतही एसेन्शियल ऑइल वापरून स्प्रे तयार करा.
तुळस स्प्रे
तुळस ही औषधीपयोगी आहे. तुळशीच्या पानांच्या वासामुळे माशा घरामध्ये येत नाहीत. तुळशीच्या पानांची पेस्ट करून ते गरम पाण्यात टाकून ठेवा. पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि माशा फिरतात त्या ठिकाणी स्प्रे करा.