‘या’ उपायाद्वारे केस गळती दूर पळवा

केस गळती सध्या ही सर्वसामान्य समस्या आहे असंच म्हणायला हवं. महिला असो किंवा पुरूष दोघांनाही केस गळतीचा सामना करावाच लागतो. केस विंचरताना थोडेसे केस गळत असतातच मात्र हे प्रमाण जास्त झालं तर मात्र लक्ष द्यायलाच हवं.अनुवांशिकता ,हार्मोन्समधील बदल,ताणतणाव, वाढतं वय, पौष्टीक आहाराचा अभाव यामुळे केस गळून पडतात. केस गळतीपासून आपली सुटका करण्यासाठी काय उपाय करावेत याची माहिती या लेखात दिलेली आहे.

डोक्याला करा मालिश
निरोगी केसांसाठी निरोगी टाळू असणं खूप महत्वाचं आहे, कारण तिथेच केसांची मुळे असतात. आठवड्यातून एकदा तेलाने टाळूवर मालिश केल्याने केसांचं आरोग्य सुधारतं. याशिवाय त्वचेतील मृत त्वचेच्या पेशी टाळूमधून काढून टाकण्यास मदत होते. जे आपल्या केसांसाठी खूप चांगले आहे. एका अभ्यासक्रमात 9 पुरूषांच्या टाळूवर दररोज चार मिनिटे मसाज करण्यात आला यामुळे केसांची वाढ होतेय असं दिसून आलं. म्हणून लक्षात घ्या तेल लावताना स्काल्पवरून सुरूवात करायला हवी.

केसांसाठी उपयुक्त नारळाचे तेल
घराघरात नारळाचे तेल केसांसाठी वापरले जाते. नारळ तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, हे तेल स्काल्पची चांगली काळजी घेण्यात आणि डोक्यातील कोंडा, कोरडेपणा किंवा कोणताही संसर्ग इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे. 2018मध्ये झालेल्या अभ्यासक्रमात असं दिसून आलंय की नारळाच्या तेलाचा वापर केसांसाठी केला तर केस गळती रोखण्यास मदत होते. नारळाच्या तेलामुळे केस मजबूत होतात त्याचबरोबर केसांचं नुकसान कमी होतं.

केसांची स्वच्छता महत्त्वाची
केस गळती थांबवायची असेल तर केसांची खास काळजी घ्यावी लागते. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांची स्वच्छता. निदान आठवड्यातून एकदा केस धुवायला हवेत.केस नियमित स्वच्छ ठेवल्यामुळे त्यात उवा,लिखा, कोंडा तसंच गुंता देखील होत नाही. केसांसाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. दररोज केसांना कर्ल, स्ट्रेट किंवा डाय करणे टाळावे त्यामुळे केसांचे नुकसान कमी होते. केसांची स्वच्छता नसेल तर फंगल इन्फेक्‍शन होते. बुरशीमुळे केस गळतात. जखमा होतात. डोक्‍यावरील त्वचा खराब होते. म्हणून केसांची स्वच्छता ठेवायलाच हवी.

केसांसाठी कांद्याचा रस
कांद्याचा रस केस गळतीवर सकारात्मर परीणाम करतो. एका अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या प्रयोगात असे आढळून आले की, टक्कल पडलेल्या भागावर सहा आठवडे दररोज कांद्याचा रस लावल्यामुळे केस वाढण्यास मदत झाली. या प्रयोगात महिला आणि पुरूष या दोघांचा समावेश होता.कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं.

आवळा आणि कोरफडचा वापर
आवळा आणि कोरफड यांचा वापर अनादिकाळापासून केसांवर होतो आहे. यामुळे केस गळती कमी होते. आवळ्यात विटामिन सी चे प्रमाण अधिक असते याशिवाय कोरफड देखील अँटी बॅक्टेरियल असल्याने केसांसाठी उपयोगी असते.आवळा हे एक उत्तम हेअर कंडीशनर आहे. त्याचबरोबर केसातील कोंडा कमी करण्यासही आवळा मदत करतो. तेव्हा तुम्हाला जर तुमचे केस कायम लांबसडक, सुंदर, चमकदार, दाट, मऊसूत आणि काळेभोर असावेत असं वाटत असेल तर मग दैनंदिन जीवनात आवळा आणि कोरफडीचा वापर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.