खरंच दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय हृतिक?

ग्रीक गॉड अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन सध्या भरपूर चर्चेत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादमुळे सध्या हृतिक चर्चेत आला आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बऱ्याच वेळेस डेटिंगवर जाताना आढळले आहेत. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. इतकंच काय तर दोघांचेही एकमेकांच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट असतात. आता तर हृतिक आणि सबा लग्नाच्या बेडीत अडकणार अशा चर्चा होत आहेत. हे दोघं एकमेकांच्या नातेसंबंधाला गंभीरपणे घेत असून लग्नाचा विचार करत आहेत अशी चर्चा होते आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हृतिक आणि सबा त्यांच्या नात्यात खूप खुश आहेत. ते कायम एकमेकांसोबत असतात. खास म्हणजे हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान बरोबर सबाचे चांगले बॉन्डिंग पहायला मिळते आहे. अगदी हृतिकच्या मुलांबरोबरही सबाची चांगलीच मैत्री आहे. मात्र लग्नाबाबत त्यांनी अद्याप काही ठरवलेलं नाही. काही महिन्यांपूर्वी दोघे लंडनला गेले होते. दोघांनी एकमेकांना एकत्रित वेळ दिला. तेव्हापासून हृतिक-सबाच्या लग्नाच्या चर्चेने अधिक जोर धरलेला आहे.