शिंदे गटात आलेल्या आमदारांना मंत्रिपद नको?

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होतो आहे. एक महिन्यापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज संधी मिळालेली आहे. शिंदे गटाकून दीपक केसरकर, दादा भुसे, तानाजी सावंत,गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड शपथ घेणार आहेत. दरम्यान शिंदे गटात आलेल्या आमदारांना मंत्रिपद नको असे म्हटले जाते आहे.
शिंदे गटात सहभागी झालेले आमदार सुहास कांदे यांनी ‘आपल्याला मंत्रिपद नको,’ असे सांगितले असल्याचे म्हटले जाते आहे. ‘मला मंत्रिपद नको मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे’ असे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आहे.
दरम्यान, भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.