नितीन गडकरींच्या मागे कोण लागलं आहे?

भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातोय अशी जोरदार चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीच्या बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कोणतंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलेलं नाही.मात्र आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय असं म्हणत जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. तसेच जनमताविरोधात राज्यांमधील सत्ता उलथवून भाजपाने मतदारांचा आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत हाच निवडणूक कार्यक्रम भाजपा जनतेसमोर मांडणार का? असा सवाल पाटील यांनी केला आहे.