CA चा निकाल जाहीर; कसा तपासाल निकाल? जाणून घ्या

CA चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ICAI ने, CA अंतिम निकाल (ICAI CA Result 2022) आज घोषित केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली.

कसा तपासायचा निकाल?

ICAI CA निकाल 2022 अधिकृत वेबसाइट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीए अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली. ICAI CA अंतिम निकाल 2022 याप्रमाणे तपासण्यात सक्षम असेल.

असा तपासा निकाल

1: सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “ICAI CA MAY 2022 RESULT” या लिंकवर क्लिक करा.
3: आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
5: आता तुमचा निकाल तपासा.
6: यानंतर निकाल डाउनलोड करा
7: शेवटी, उमेदवारांनी पुढील गरजेसाठी निकालाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.