दीपाली सय्यद यांची मनसेवर पुन्हा टोलेबाजी !

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझ्यामते दूध आणि दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला हवा, कारण त्यावर कुणीही वाटेल ते टाकत असतात, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावरुनच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/deepalisayed/status/1551399998373253120

माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे? ग्रीनटीच्या व्हिडीओला शिलेदार दारू म्हणून पसरवून पक्षाची इज्जत वाचवताना आम्ही पाहिलेले आहे, बदनामी करण्याच्या कंत्राटावर पण जीएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.दीपाली सय्यद नेहमीच ट्विटच्या माध्यमातून मनसेवर टोलेबाजी करत असतात.

“माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे? ग्रीन-टीच्या व्हिडीओला शिलेदार दारू म्हणून पसरवून पक्षाची इज्जत वाचवताना आम्ही पाहिले आहे, बदनामी करण्याच्या कंत्राटावरपण जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल,” असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.दीपाली सय्यद नेहमीच ट्विटच्या माध्यमातून मनसेवर टोलेबाजी करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.