‘ठाकरे सरकार’ कोसळणार हे ‘काँग्रेस’ च्या ‘या’ नेत्याला आधीच होतं माहित?

शिवसेनेने अनेक बंड पाहिले पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना हादरून गेली. शिंदेंचा बंड, मविआर सरकार कोसळणे आणि शिंदे सरकार येणे असा विचार कोणीच केला नव्हता. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील ठाकरे सरकार कधी जाणार आणि शिंदे सरकार कधी येणार याची माहिती नव्हती पण शिवसेनेचे सहकारी त्यांना मात्र ही गोष्ट अगदी अचूकपणे माहित होती.
तुम्हाला माहित आहे कोण आहे तो शिवसेनेचा सहकारी, ज्याने मविआ सरकारमध्ये शिवसेनेला हात दिला त्याच काँग्रेसच्या नेत्याचं एक पत्र सोशल मीडिया व्हायरल होतंय. २० जूनला हे पत्र लिहीलं असून या पत्रात शिंदे यांचा बँड यशस्वी कधी होणार या बद्दल माहिती लिहीलेली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी २० जून रोजी मतदान झालं आणि रात्रीच निकाल लागला. त्याच रात्री शिवसेनेचे आमदार फुटले आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली गुजरातला रवाना झाले. २१ जूनला सकाळी ही बातमी सगळीकडे पसरली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला.
पण एक व्यक्ती होती तिला शिंदेंच्या बंडाची तंतोतंत खबर लागली होती ती व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत. त्यांनी लिहीलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. नितीन राऊत यांनी 20 जून रोजी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव यांना एक पत्र लिहिलं. त्यात राऊत यांनी आपल्या कार्यकाळावर आधारीत एक कॉफीटेबल बुक प्रकाशित करण्याची विनंती केली. त्या पत्रात लिहीलंय ६ जानेवारी २०२० रोजी ऊर्जामंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला तर २९ जून २०२२ ला मंत्रीपद संपुष्टात येत आहेत हे पाहून 906 दिवस मी हा कार्यभार सांभाळला आहे.
आता नितीन राऊतांचं कॉफी टेबल बूक तयार झालं की नाही याची माहिती हाती आलेली नाही पण यासाठी जे पत्र लिहीलं त्यात सरकार कधी जाणार हे राऊतांनी तारखेसह सांगितलं. बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले आमदार परत येतील म्हणून वाट पाहिली पण ज्या दिवशी बंड झालं त्याच दिवशी काँग्रेसच्या मंत्र्यांना बंडाची फक्त चाहुलच लागली नाही तर ठाकरे सरकार कधी कोसळणार याची तारखेसह माहिती होती याबद्दल सगळ्यांनी आर्श्चय व्यक्त केलंय. काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं हे पत्र सध्या तुफान व्हायरल होतंय
२९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ३० जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.आता प्रश्न असा आहे काँग्रेस नेत्याला हे सर्व कसे समजले हा निव्वळ योगायोग की आणखी काही?