
IND vs BAN: A photo of Rohit Sharma, Gautam Gambhir and Ravindra Jadeja goes viral, will there be a big change in the team?
IND vs BAN : रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजाचा एक फोटो व्हायरल,संघात मोठा बदल होणार?Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा पहिला चॅम्पियन्स ट्रॉफी सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यातून रवींद्र जडेजाला वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Champions Trophy 2025, IND vs BAN दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील रोमांचक सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणखी एका मोठ्या ICC स्पर्धेत विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम प्लेइंग इलेव्हन कसा असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच सोशल मीडियावर रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजाचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांनी जडेजाला संघाबाहेर करण्याचा निर्णय झाला असावा, असा अंदाज वर्तवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूंतून ऑलराउंडर रवींद्र जडेजाला वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
रवींद्र जडेजाला वगळण्यामागील कारण काय? सोशल मीडियावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजामध्ये बराच वेळ चर्चा झाली, असा दावा काही क्रिकेट तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे चाहत्यांनी अनुमान काढले की, जडेजाला संघातून वगळण्याचा निर्णय झाला असावा आणि गंभीर त्यासंदर्भात त्याला समजावून सांगत असावा.
स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान भारताचे माजी फिरकीपटू पीयूष चावलाने सांगितले की, बांगलादेश संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भारताला ऑफ स्पिनरची आवश्यकता भासू शकते. याच कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट रेकॉर्ड : भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 41 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले, तर बांगलादेशने 8 विजय मिळवले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
भारताने तटस्थ स्थळी बांगलादेशविरुद्ध 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 विजय मिळवले, तर 2 सामने गमावले आहेत.
भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, हार्दिक पांड्या, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर