भारताच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहला ट्रोल करणाऱ्यावर पत्नी संतापली…

भारतीय संघ दुबईत आशिया चषक खेळत असून सुपर ४ च्या पहिल्याच सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. आता पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर टीका तर होणारच. दरम्यान क्रिकेटप्रेमींना सध्या विश्रांती घेत असलेल्या गोलंदाजांवर टीका केली आहे. त्यात समावेश आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा !
जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. दरम्यान त्याची पत्नी संजना गणेशन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट जसप्रीतबरोबरच एक जुना फोटो शेअर केला होता. ‘मी, जसप्रीत आणि त्याच्या बुटांचा थ्रोबॅक फोटो.’ संजनाने लिहलंय की हे बूटच या फोटोमधील खरे स्टार्स आहेत. हा फोटो वेगाने व्हायरल झाला आणि त्यावर अनेक क्रिकेटप्रेमींनी कमेंट्स केल्या. यातील एका चाहत्याने लिहिले की, इथे पाकिस्तानसमोर टीम इंडियाची अवस्था बिकट होत चालली आहे आणि तुम्ही लोक फिरत आहात. यावर संजनाने उत्तर दिले की ‘थ्रोबॅक फोटो आहे, तो दिसत नाही का, चोमू माणसा?’ संजनाच्या या कमेंटवर हजारो लाइक्स आलेl. चाहत्यांनी तिची ही स्टाइल खूपच आवडली आहे.
जसप्रीत बुमराहबद्दल अनेक चाहत्यांनी लिहिले की, पाजी, लवकर परत या. काहींनी लिहिलं की, तुमच्याशिवाय इथं संघाची अवस्था बिकट झाली आहे. आशिया चषकानंतर भारताला दोन मालिका खेळायच्या आहेत, त्यानंतर टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही भारतासाठी चांगली बातमी असेल.