वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार!

भारताने येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला कर्णधार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या तीन वनडे आणि तीन टी 20 संघात शिखर धवनचा समावेश नव्हता. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला वनडे संघाचा थेट कर्णधारच करण्यात आले आहे.

भारत 22 जुलैपासून भारत वेस्ट इंडीज दौऱ्यावर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच सुरू होत असल्याने बीसीसीआयने भारतीय वनडे संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाची धुरा भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून रविंद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे.

याचबरोबर बीसीसीआयने विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. तसेच संजू सॅमसनने टी 20 पाठोपाठ वनडेतही भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर शुभमन गिलने देखील संघात पुनरागमन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.